Monday, 25 July 2016

मनस्थिती बदला ::निरोगी व्हा

            🌸इम्पेशन्स (Impatience)
 इम्पेशन्स च्या व्यक्तींना सतत कसली ना कसली घाई असते.चालणे ,बोलणे,जेवणे ही कामे अत्यंत वेगाने करत असतात.आणि त्यांच्या प्रमाणेच इतरांनीही तशीच वेगाने करावीत अशी त्यांची अपेक्षा  असते.जर त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्या वेगाप्रमाणे काम केले नाही तर ते रागावतात.ही लोक अत्यंत हुशार ,बुद्धीमान असतात.
           परंतु या त्यांच्या  चंचल स्वभावामुळे त्यांना मानसिक ताणही येतो.या ताणाचा परिणाम त्यांच्या  शरीरावर होतो.त्यांना अर्धशिशी,पचनाच्या तक्रारी,शांत झोप न लागणे,स्नायुंच्या तणावजन्य तक्रारी जाणवतात।घाईगडबडीमुळे छोटे मोठे अपघात ही अनेक वेळा होतात.
          लहान मुलातही घाईगडबडीमुळे  स्पेलिंग  मध्ये चुका होतात.गणितात क्षुल्लक चुका होतात.मन एकाग्र होत नाही.
       अशा सर्वानी इम्पेशन्स औषध घेतले तर त्यांच्यातही पेशन्स येतात.
मनस्थिती बदला::निरोगी व्हा

             🌸हाॅर्न बीम (Horn beam)

      काही वेळा  कामाला सुरूवात करण्यापुर्वी ,हे काम मला जमेल की नाही? असे वाटून थकवा जाणवतो.अर्थात कामाला सुरूवात केल्यानंतर कामे कुशलतेने पार पडतात.सकाळी उठल्यानंतर काहींना दिवसभराचे कामे आठवून थकवा जाणवतो.काहींना रविवारची सुट्टी मजेत घालवल्यानंतर सोमवारी ऑफीस ला जाण्याचा कंटाळा येतो.म्हणूनच या औषधाला MONDAY MORNING REMEDY पण म्हणतात.
        अनेक व्याख्याते,नट,गायक यांना कार्यकार्यसुरू करण्यापुर्वी  बेचैनी जाणवते.आत्मविश्वास कमी होतो.एकदा कार्यक्रम  सुरू केल्यावर मात्र छान पार रंगतो.
        काही लहान मुलेही सकाळी  उठले की किरकिर ,हट्ट करतात.मी आज शाळेत नाही जाणार असे म्हणत रडारड करतात.
       या सर्वाना हाॅर्नबीम चे औषध देवू शकतो..
मनस्थिती  बदला::निरोगी व्हा

             🌸हनीसकल(Honeysuckle)

     "भुली हुई यादो मुझे इतना न सताओ ...."अशी काहीशी अवस्था  असते.भुतकाळात रमणारे लोकं..यांच्यासाठी हे औषध आहे.भुतकाळातील काही दुःखद प्रसंग,पश्चातापाचे क्षण,अपुर्या राहिलेल्या इच्छा यांचा जर वर्तमान काळावर परिणाम होत असेल तर हे औषध द्यावे.
        प्रिय व्यक्तीचा अचानक आलेला मृत्यू, एखाद्या भीतीदायक प्रसंग घडून गेलेला असेल तर .. याचा वर्तमानकाळावर परिणाम होतो.
        तसेच लहान मुलात,आईवडलांना  सोडून नातेवाईकाकडे रहावे लागणे,होस्टेल वरील काही दिवस न करमणे(Homesick),नववधूला सासरी राहण्याचे पहिले काही दिवस,नोकरी बदला मुळे दुसर्या गावात गेल्यानंतर वाटणारी हुरहूर..या सर्वासाठी हे औषध योग्य आहे.नविन वातावरणाशी जुळवून घेणारे हे औषध आहे.

Tuesday, 5 July 2016

                        मनस्थिती बदला::निरोगी व्हा।

                                💐 15.हाॅली (HOLLY)

          प्रेम ही भावना मानवाचा जगण्याचा पाया आहे.ही अत्युच्च पाॅझीटीव्ह फ्रिक्वेन्सी आहे.त्याविरूद्ध मत्सर,राग,द्वेष ह्या भावना आहेत.मत्सर,द्वेष यामुळे  जीवनच असुरक्षित  वाटू लागते.मत्सरामुळे संशय वाढतो,गैरसमज,दुराग्रह वाढतो.कारण तिथे प्रेम संपलेले असते.बर्याचशा ह्रदयरोगाचे कारण हे प्रेमाचा अभाव असते.प्रेमाअभावी आपण
 संकुचित बनतो.यासाठी हाॅली हे उत्तम औषध आहे.डाॅ.बॅच म्हणतात,'प्रेम'या भावनेच्या जे जे विरूद्ध आहे,त्या प्रत्येक भावनेपासून बचाव करण्यासाठी हाॅली हे औषध आहे.एखाद्या रूग्णाला कोणत्याच औषधाचा उपयोग होत नाही तेव्हा हाॅली हे औषध देऊन पहावे.त्यामुळे इतर औषधाचे चांगले परिणाम दिसायला लागतात.
           आपण आपल्या आजूबाजूला ..संपत्ती वरून भावाभावात होणारी भांडणे ,नवरा बायकोचा एकमेकांवर संशय घेणे,शेजारच्या कडे अमूक अमूक गोष्ट आहे माझ्याकडे नाही किंवा त्याच्या मुलाला माझ्या मुलापेक्षा अधिक मार्कस पडले त्यामुळे  झालेला मत्सर अशी अनेक उदाहरणे आपण पहातो.माझे चांगले झालेले लोकांना पहावत नाही.माझे  वाईट करण्याकरताच लोकं टपलेले आहेत.असे सतत वाटत रहाते.
                अगदी लहान मुलांमध्येही आपल्याला ही लक्षणे दिसतात.लहान भावंडाला आईने मांडीवर घेतले..मला नाही घेतले म्हणून आकांडतांडव  करणारे मूल आपण पाहीले असेल.लहान भावंड घरात आल्यावर सहाजिकच सर्वांचे लक्ष मोठ्या कडून वळून लहानाकडे जाते.अशा वेळी लहान भावंडाचा हळूच चिमटे घेऊन त्रास देणारे मूलही पाहिले असेल.किंवा एखाद्या वर्गमित्राचे शिक्षकांनी कौतुक केलेले यांना सहन होत नाही.अस्वस्थ होते.
अशा स्वभावाच्या लोकांसाठी हाॅली हे उत्तम औषध आहे.


Sunday, 3 July 2016

मनस्थिती बदला :: निरोगी व्हा

         🌸14.हिदर (Heather)

हिदर चे व्यक्ति  आत्मकेंद्रीत असतात.'मी' 'माझे ..''माझे असे...''माझे तसे...'असे सतत मी ...मी चा पाढा गिरवणारे व्यक्ती  आपण आजूबाजूला पाहात असतो.ह्यांना फक्त स्वतःविषयी बोलण्यातच रस असतो.स्वतःची अगदी क्षुल्लक गोष्ट ही ते दुसर्याला सांगत बसतात.स्वतःची कर्तबगारी,आजारपण,रोजच्या जीवनातील स्वतःच्या बारीक सारीक गोष्टी दुसर्याला सांगत असतात.एखाद्या समारंभात गेले तरी विषयाचा रोख आपल्याकडे वळवून स्वतःला बोलण्याचा केंद्रबिंदू करतात.समोरच्या माणसाचा आपल्या बोलण्याकडे इंटरेस्ट आहे की नाही याचीही दखल घेत नाहीत.त्यामुळे आजूबाजूची लोकं यांना टाळतात.
            दवाखान्यात आल्यावर स्वतःच्या आजाराविषयी इतके विस्ताराने सांगतात,त्यांना लहानपणापासून काय काय आजार झाले होते..भले त्याचा संबंध आजच्या आजाराशी असो वा नसो.
     अगदी लहान मुलातही असा स्वभाव पहायला मिळतो.ही मुले उथळ,आत्मकेंद्रीत  
असतात.त्यामुळे स्मरणशक्ती चा अभाव असतो.समोरच्याचे म्हणणे ऐकून घेत नाहीत.
       अशा स्वभावाच्या लोकांना हिदर नक्की देऊन पहा.
मनस्थिती बदला :: निरोगी व्हा

13::🌸.गाॅर्स::(GORSE)

पूर्ण निराशा, कुठूनच आशेचा किरण न दिसणे.या अवस्थेत ही पुष्पौषधी वापरतात. दीर्घकालीन आजाराच्या बाबतीत काही पेशंट इतके निराश झालेले असतात की आता कशानेच बरे वाटणार नाही अशी समजूत ते करून घेतात.अशा वेळी आधी गाॅर्स देऊन पेशंटमध्ये बरे होण्याची 'आशा 'निर्माण  करावी नंतर इतर उपचारांना सुरूवात  करावी.
          काही दिवसांपुर्वी एक 45 वयाच्या पेशंट क्लिनिक मध्ये आल्या होत्या.त्यांचे पती अचानक निवर्तले होते.कशातच त्यांचे मन लागत नव्हते.काहीच करावेसे वाटत नव्हते.त्यांचा जुना दम्याचा त्रास डोके वर काढू लागला.आता कुणासाठी उपचार घ्यायचे?जगून तरी काय उपयोग?अशी तीव्र  निराशा त्यांच्यात आली होती.त्यांना दोन महिने गाॅर्स  दिले.त्या दम्याच्या औषधांनाही चांगला प्रतिसाद देऊ लागल्या.आणि आता त्यांनी स्वतःचे बुटीक सुरू केले आहे.
मनस्थिती  बदला :: निरोगी व्हा::

🌸 12.जेटिंयन (GENTIAN)

             प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात.सकारात्मक आणि नकारात्मक .जेंटीयन प्रकारचे लोक नकात्मक बाजू आधी बघतात.गुलाबाच्या झाडाजवळ  गेल्यावर त्यांना फुललेला गुलाब दिसण्याआधी त्याचे काटेच दिसतात.तसेच छोट्या छोट्या कारणावरून उदास होतात..निराश होतात..उदा. गाडी उशिरा येणे,हवी ती वस्तु  लवकर न सापडणे,हवं ते दुकान बंद असणे,मोलकरीण आली नाही..अशा किरकोळ  कारणांवरून येता जाता ही लोक निराश होतात.जीवनातला आनंद घालवून बसतात.
          चाचणी परीक्षेत थोडे कमी मार्क पडले ,शिक्षक रागावले की आता शाळेतच जाणार नाही,असं म्हणणारे विद्यार्थी, खेळताना छोट्या कारणावरून माघार घेऊन घरी येणारी मुले..थोडंसंही मनाविरुद्ध  झालेले यांना खपत नाही.सोपवलेले काम जमत नाही असे लक्षात आल्यावर लगेच ते काम सोडून देतात.
       परिस्थीतीला टाळून दूर पळून जाण्याची वृत्ती नाहीशी करण्यासाठी जेंटीयन चा चांगला उपयोग होतो.

Sunday, 26 June 2016

मनस्थिती बदला :: निरोगी व्हा

          11.एल्म (ELM)

हे औषध  अशा कर्तबगार लोकांसाठी आहे ज्यांचा आत्मविश्वास काही काळापुरता कमी होतो. ह्या व्यक्ती खूप हुशार ,बुद्धिमान,कर्तबगार असतात.घरात ,समाजात मानाचे स्थान भुषवत असतात.उदा. डाक्टर्स, मुख्याध्यापक,उद्योगपती,मंत्री,मोठ्या कुटुंबातील  कुटुंबप्रमुख .त्यांच्या निर्णयावर इतरांचे जिवीत अवलंबून असते.जबाबदारीच्या ओझ्यामुळे  त्यांना काही काळापुरते निराशा येते,असमर्थ वाटते,निर्णय घेता येत नाही.हे तात्कालिक  असते.पण या काळात  एखादा चुकीचा निर्णय घेतला गेला तर त्याचे परिणाम  सर्वानाच भोगावे लागतात.
        वाढत्या स्पर्धेमुळे ही  हुशार मुलांना आलेले नैराश्य या सर्वासाठी हे औषध खूप उपयोगी आहे.
माझ्याकडे 3 महिन्यापुर्वी एक 85 ते 90 टक्के मिळवणार्या मुलाची  आई त्याला घेऊन आली होती...अगदी हतबल होऊन ती सांगत होती.  'पहा ना डाॅक्टर 10 वी ची परीक्षा  15 दिवसावर आली आहे आणि हा परीक्षा द्यायचे नाही म्हणतोय..आम्हाला तर काय करावे काहीच कळत नाही..'मी त्याला समजावले..आणि एल्म हे औषध दिले.त्याने  10 वी चे पेपर्स  चांगले दिले..95 टक्के ची अपेक्षा  आहे त्याला.

Thursday, 23 June 2016

मनस्थिती बदला  ::  निरोगी व्हा

             🌸 10. क्रॅब अॅपल

कधी कधी आपल्या स्वभावातील एखादा दोष आपल्याला अजिबात आवडत नाही.आपली आपल्यालाच किळस वाटत राहते.कधी आपण आपल्या स्वभावा विरूद्ध एखादे वाईट भाष्य किंवा कृती करून जातो ,त्यामुळे  मनात नसतानाही दुसरा माणूस दुःखी होतो आणि मग आपण असे का बोललो हा विचार मनात काट्यासारखा सलत राहतो.मन अशांत होते .अशा वेळी  क्रॅब अॅपल ची गरज असते
          कधी कधी इसब ,नायटा ,एखादा  त्वचारोग स्वतःला अथवा इतरांना  झाल्यास त्याची किळस वाटू लागते.
एखादी गृहीणी स्वच्छतेच्या विचारांनी इतकी पछाडलेली असते की धूळ ,कचरा,घाण ,अस्वच्छता  ,दुर्गंधी पाहीली की यांचे मनस्वास्थ्य नष्ट होते.
अशांसाठी हे पुष्पौषध उपयोगी आहे.

Wednesday, 22 June 2016

मनस्थिती  बदला :: निरोगी व्हा

          🌸 9. क्लेमॅटिस (CLEMATIS)

ही लोक जणू वेगळ्याच  जगात वावरत असतात.कुठेतरी शून्यात हरवलेली नजर,उदासीनपणा,स्वप्निलपणा,झोपाळूपणा इ.लक्षण वैशिष्ट्ये  यांच्यात आढळतात.आजूबाजूला काय चालले आहे याची ते दखलच घेत नाहीत.त्यांना झोपही खूप लागते.कोणत्याही कामात त्यांचे चित्त एकाग्र  होत नाही कारण वर्तमान काळातील घडामोडी,जीवनातील लहानमोठ्या घटना यांचे औचित्य च नष्ट झालेले असते.आपल्या अडचणी ,जीवनातील दुःखदायक गोष्टी मनाच्या पडद्याआड करतात.जेव्हा एखाद्या दुःखदायक परिस्थिती ला तोंड द्यायची वेळ  येते तेव्हा संकटांचा मुकाबला करण्याऐवजी खोट्या आभासी जगात वावरतात.
       हे मूल वेंधळे  ,आपल्याच विचारात हरवलेले असते.मग कुठेतरी ठेचकाळते,कोलमडते.स्वतःच्या तंद्रीत  असल्याने  वर्गात शिकवलेले कळत नाही.

Monday, 13 June 2016

मनस्थिती बदला :: निरोगी व्हा

        🌸 8. चिकोरी  (CHOCORI)

या  औषधाचे लोक स्वार्थी  व स्वतःला महत्व देणारे असतात.ही कुठेही गेलीत तरी स्वतःपुरते पाहातील.आत्मकेंद्री व अहंकारी असतात.छोट्या छोट्या कारणाने त्यांच्यातला अहं दुखावला जातो.आपल्या जवळच्या व्यक्तींवर त्या अधिकार गाजवतात.प्रेमाच्या व्यक्ती  सतत आपल्याच जवळ रहाव्यात असा त्यांचा आग्रह  असतो.यांच्याकडे कुणी लक्ष  दिले नाही की रूद्रावतार धारण करतात.स्वतःकडे इतरांचे लक्ष  वेधून घेण्यासाठी  काहीच मिळाले नाही तर या व्यक्ती  आजाराचे माध्यम  शोधतात .व सहानुभूति  मिळवतात.
         ही वृत्ती अगदी तान्हया बाळात सुद्धा  असते. बाळाला  सतत आई समोर लागते.चालायला लागले की आईचा पदर धरून राहणार .थोडीही मोकळीक मिळू देत नाही.हे मूल आपले खेळणे दुसर्याला देत नाही.

Friday, 3 June 2016

मनस्थिती बदला ::निरोगी व्हा

           🌸7. चेस्टनट बड

        काही माणसे आयुष्यात त्याच त्याच चुका करताना आढळतात .मागील अनुभवावरून, केलेल्या चुकांवरून धडा घेऊन  कृती करणे त्यांना जमत नाही.कधी उदासीनतेमुळे,कधी दुर्लक्ष  केल्यामुळे, घाईगडबडीत कृती केल्यामुळे  किंवा कधीकधी आपल्या कृतींचा मागोवा न घेतल्यामुळे ,पुरेशी निरीक्षणशक्ती नसल्यामुळे  त्याच त्याच चुका परत परत केल्या जातात.
यांना एकाच प्रकारचे आजार वारंवार होतात.
     अभ्यासात मागे राहणारी मुले,त्याच प्रकारच्या चुका करून अपयशी होणारे विद्यार्थी.
       नविन गोष्टी  लवकर आत्मसात करता न येणे.पुर्वीपेक्षा स्मरणशक्ति  कमी झालीय त्यामुळे चटकन शिकता येत नाही अशी तक्रार  करणारे प्रौढ .
 या सर्वासाठी चेस्टनटबड हे उत्तम औषध आहे.

Monday, 30 May 2016

मनस्थिती बदला ::निरोगी व्हा::

          🌸 चेरी प्लम (CHERRY PLUM)

    असह्य ताणतणावांमुळे मानसिक संतुलन बिघडवणार्या  स्थितीत हे औषध तारणहार ठरते.या व्यक्तीने दीर्घकाल शारिरिक  किंवा मानसिक किंवा दोन्हीही यातना सहन केलेल्या  असतात.गोष्टी सहनशक्ती  च्या पलीकडे गेल्या असताना आपल्या हातून आता कोणतेही भयानक कृत्य घडेल अशी भीती या पेशंटला वाटते.त्यांच्या मनावर त्यांचा ताबा राहीलेला नसतो.'कळते पण वळत नाही 'अशी अवस्या असते.अनावर रडू येते.त्रास देणारे विचार सतत येतात.
         लहान मुलांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर..'मुलगा आमचे अजिबात ऐकत नाही',अशी तक्रार  घेऊन पालक येतात.टीव्ही पाहण्यात वेळ  घालवणे नुकसानकारक आहे हे कळूनही टी व्ही पाहतोच.गोड खाणे डायबेटीस साठी अपथ्य कर आहे हे माहीत असूनही काही डायबेटीक पेशंट खातातच.एका जाहीरातीतील वाक्याप्रमाणे....
"क्या करू..कंट्रोल ही नही होता."अशी यांची अवस्था असते.
यांची डोकेदुखी अनावर ,खरेदीचा मोह अनावर,पाळीचा स्त्राव अनावर,व्यसन अनावर,स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीच्या वेळी रडणे,चिडचिडणे अनावर होते
या सर्व गोष्टींची तीव्रता  चेरीप्लम मुळे आटोक्यात येते.

Friday, 27 May 2016

मनस्थिती बदला।  ::  निरोगी व्हा
    ***  *****  *****  ***

         🌸 सिरॅटो (CERATO)

'ऐकावे जनाचे करावे मनाचे 'अशी मराठीत म्हण आहे.  पण  काही व्यक्ती  ऐकतात सर्वांचे आणि करतात ही सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे.नक्की काय करावे हे समजत नसल्याने इतरांना सल्ले विचारत फिरतात.आणि जो जसं म्हणेल तसे वागतात.स्वतःवरच विश्वास नसल्याने  त्यांचा गोंधळ  उडतो. नेमकी करीअर ची कोणती शाखा निवडावी,कोणत्या क्लासला जावे,औषधोपचार नेमका कोणता ,कसा घ्यावा ,पैसे कसे गुंतवावे अशा विवीध बाबतीत अनेकांना सल्ले विचारून प्रत्यक्षात कृती काय करावी  हे न समजणार्यांना सिरॅटो देतात.शब्दांची निवड पटपट न जमल्याने अडखळत बोलणार्यांनाही या औषधाने लाभ होतो.सिरॅटो हे शहानपणा प्रदान करणारे औषध आहे.

Thursday, 26 May 2016

मनस्थिती  बदला। ::  निरोगी व्हा
***  *****  *****  ***

       🌸सेंटाॅरी(Centaury)

हे लोक सहजच दुसर्याच्या अधिपत्याखाली येतात.समोरच्याला नकार देणे त्यांना  जमत नाही.इतरांचे म्हणणे आपल्यावर लादून घेतात.मुकाट्याने इतरांची कामे करत दमून जातात.या लोकांचे व्यक्तिमत्व कमजोर असते.इतर लोक त्यांना सहज गुंढाळतात.
   अशा व्यक्ती  हुशार ,क्रियाशील असतात.पण इतरांच्या इच्छा,मते यांना बळी पडून स्वतःचे तेज ,शक्ती घालवून बसतात.त्यांच्या स्वभावाचा अनेकजण फायदा घेतात.
      शाळेतही अशा प्रकारची मुले पहायला मिळतात.हे मुल सुस्वभावी असते.इतरांना दुखावत नाही.बाकीची मुले यांच्यावर दादागीरी करतात. मुखदुर्बल असल्याने आतल्या आत घुसमटते .सतत मागे राहतात.
       अशा लोकांना सेंटाॅरी हे औषध दिल्याने त्यांचे झाकोळलेले आत्मतेज जागृत होते.

Tuesday, 24 May 2016

मनस्थिती  बदला :: निरोगी व्हा
***  *****  *****  ***

         🌸 बीच (BEECH)

या औषधाचे लोक सतत चिडत, रागावत असतात.सतत लोकांचे दोष काढत असतात.शिस्त ,काटेकोरपणा याबाबतीत अतिशयोक्ती  करत राहतात.समोरच्याची हतबलता लक्षात न घेता सिद्धांताला महत्व देतात.त्यांना प्रत्येक ठिकाणी परिपूर्णता हवी असते.अजिबात सहनशीलता नसते.पण त्यामुळे  माणसे त्यांच्यापासून दुरावत जातात.
       त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना अम्लपित्त,त्वचारोग ,अॅलर्जी,दमा(अस्थमा) हे रोग होऊ शकतात.
  बीच हे औषध दिल्यानंतर कडक शिस्तीबद्दलचा त्यांचा आग्रह कमी होतो.आजूबाजूच्या लोकांचे जीवन सुसह्य  होते.त्यांचा स्वतःचा मनस्तापही कमी होतो.
  पहा तर मग तुमच्या आजूबाजूला असे जमदग्नी चे अवतार कोण आहेत?
मनस्थिती  बदला  ::  निरोगी व्हा
***  *****  *****  ***

2.आस्पेन (Aspen)

या औषधाच्या लोकांना  भीती वाटत असते.पण ही भीती नेमकी कशाची वाटते हे सांगता येत नाही.अनाकलनीय ,गुढ गोष्टींची भीती वाटत असते.त्याचे स्पष्टीकरण त्यांना देता येत नाही.कधीकधी ही भीती इतकी असते की त्यांना अचानक दरदरून घाम फुटतो.झोपेतून अचानक जागा होऊन ओरडून ऊठतो.लहान मुलांना,
टीन एज मधील मुला मुलींना किंवा रजोनिवृत्तीच्या वेळी काही स्त्रीयांना अशी भीती जाणवू शकते.
          दोन महिन्यापुर्वी एक त्रासलेले आईबाबा त्यांच्या 6 महिन्याच्या मुलाला घेऊन  माझ्याकडे आले.त्यांची अशी तक्रार  होती की त्यांचा हा मुलगा 3 महिन्यांपासून अचानक रडतच झोपेतून
उठतो.काही केल्या थांबत नाही.रडून रडून पहाटे कधीतरी झोप लागते.त्यांना संध्याकाळी  च परदेशात जायचे असल्याने लगेचच काही औषध देणे भाग होते.माझा हात आस्पेन कडे गेला.
त्यांना 2 गोड गोळ्या  चमचाभर पाण्यात विरघळवून 4 वेळा द्यायला सांगितले .महिन्या नंतर त्यांचा फोन आला...मुलाची ही तक्रार पूर्ण गेली.आता दूधही नीट प्यायला लागला.
त्यावेळी  पुष्पौषधी सारखी औषधे आपल्याकडे  आहेत याचे समाधान वाटले.कारण इतक्या लहान मुलाला या समस्येसाठी दुसरे काहीच देता येण्यासारखे नव्हते.
मनस्थिती  बदला : निरोगी व्हा

1::अॅग्रीमनी(Agrimony )::

आपल्या अवती भोवती हसणारे,खूप गप्पा मारणारे ,विनोदबुद्धी असणारे असे अनेक लोक आढळतात.पण वरवर आनंदी आहोत असे भासवणारे   काही लोक  मात्र आतून  पुर्ण विदीर्ण  मनस्थितीत असतात.आनंदी पणाच्या मुखवट्याआड आपले दुःख लपवत असतात.आपल्या चिंता ,वेदना ,काळजी सहन करत असतात.मनातील विचारांच्या गर्दीमुळे  यांना शांत झोपही येत नाही.अशा व्यक्तींना एकटे रहायला आवडत नाही.चारचौघात राहणे आवडते.
काही लहान मुलेही वयाला न शोभणारा समजूतदार पणा दाखवतात. त्यांचा  बालपणातील अवखळपणा  ,निरागसता हरवलेली असते.
अशांसाठी अॅग्रीमनी  हे औषध उपयुक्त  आहे.