Monday, 30 May 2016

मनस्थिती बदला ::निरोगी व्हा::

          🌸 चेरी प्लम (CHERRY PLUM)

    असह्य ताणतणावांमुळे मानसिक संतुलन बिघडवणार्या  स्थितीत हे औषध तारणहार ठरते.या व्यक्तीने दीर्घकाल शारिरिक  किंवा मानसिक किंवा दोन्हीही यातना सहन केलेल्या  असतात.गोष्टी सहनशक्ती  च्या पलीकडे गेल्या असताना आपल्या हातून आता कोणतेही भयानक कृत्य घडेल अशी भीती या पेशंटला वाटते.त्यांच्या मनावर त्यांचा ताबा राहीलेला नसतो.'कळते पण वळत नाही 'अशी अवस्या असते.अनावर रडू येते.त्रास देणारे विचार सतत येतात.
         लहान मुलांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर..'मुलगा आमचे अजिबात ऐकत नाही',अशी तक्रार  घेऊन पालक येतात.टीव्ही पाहण्यात वेळ  घालवणे नुकसानकारक आहे हे कळूनही टी व्ही पाहतोच.गोड खाणे डायबेटीस साठी अपथ्य कर आहे हे माहीत असूनही काही डायबेटीक पेशंट खातातच.एका जाहीरातीतील वाक्याप्रमाणे....
"क्या करू..कंट्रोल ही नही होता."अशी यांची अवस्था असते.
यांची डोकेदुखी अनावर ,खरेदीचा मोह अनावर,पाळीचा स्त्राव अनावर,व्यसन अनावर,स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीच्या वेळी रडणे,चिडचिडणे अनावर होते
या सर्व गोष्टींची तीव्रता  चेरीप्लम मुळे आटोक्यात येते.

Friday, 27 May 2016

मनस्थिती बदला।  ::  निरोगी व्हा
    ***  *****  *****  ***

         🌸 सिरॅटो (CERATO)

'ऐकावे जनाचे करावे मनाचे 'अशी मराठीत म्हण आहे.  पण  काही व्यक्ती  ऐकतात सर्वांचे आणि करतात ही सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे.नक्की काय करावे हे समजत नसल्याने इतरांना सल्ले विचारत फिरतात.आणि जो जसं म्हणेल तसे वागतात.स्वतःवरच विश्वास नसल्याने  त्यांचा गोंधळ  उडतो. नेमकी करीअर ची कोणती शाखा निवडावी,कोणत्या क्लासला जावे,औषधोपचार नेमका कोणता ,कसा घ्यावा ,पैसे कसे गुंतवावे अशा विवीध बाबतीत अनेकांना सल्ले विचारून प्रत्यक्षात कृती काय करावी  हे न समजणार्यांना सिरॅटो देतात.शब्दांची निवड पटपट न जमल्याने अडखळत बोलणार्यांनाही या औषधाने लाभ होतो.सिरॅटो हे शहानपणा प्रदान करणारे औषध आहे.

Thursday, 26 May 2016

मनस्थिती  बदला। ::  निरोगी व्हा
***  *****  *****  ***

       🌸सेंटाॅरी(Centaury)

हे लोक सहजच दुसर्याच्या अधिपत्याखाली येतात.समोरच्याला नकार देणे त्यांना  जमत नाही.इतरांचे म्हणणे आपल्यावर लादून घेतात.मुकाट्याने इतरांची कामे करत दमून जातात.या लोकांचे व्यक्तिमत्व कमजोर असते.इतर लोक त्यांना सहज गुंढाळतात.
   अशा व्यक्ती  हुशार ,क्रियाशील असतात.पण इतरांच्या इच्छा,मते यांना बळी पडून स्वतःचे तेज ,शक्ती घालवून बसतात.त्यांच्या स्वभावाचा अनेकजण फायदा घेतात.
      शाळेतही अशा प्रकारची मुले पहायला मिळतात.हे मुल सुस्वभावी असते.इतरांना दुखावत नाही.बाकीची मुले यांच्यावर दादागीरी करतात. मुखदुर्बल असल्याने आतल्या आत घुसमटते .सतत मागे राहतात.
       अशा लोकांना सेंटाॅरी हे औषध दिल्याने त्यांचे झाकोळलेले आत्मतेज जागृत होते.

Tuesday, 24 May 2016

मनस्थिती  बदला :: निरोगी व्हा
***  *****  *****  ***

         🌸 बीच (BEECH)

या औषधाचे लोक सतत चिडत, रागावत असतात.सतत लोकांचे दोष काढत असतात.शिस्त ,काटेकोरपणा याबाबतीत अतिशयोक्ती  करत राहतात.समोरच्याची हतबलता लक्षात न घेता सिद्धांताला महत्व देतात.त्यांना प्रत्येक ठिकाणी परिपूर्णता हवी असते.अजिबात सहनशीलता नसते.पण त्यामुळे  माणसे त्यांच्यापासून दुरावत जातात.
       त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना अम्लपित्त,त्वचारोग ,अॅलर्जी,दमा(अस्थमा) हे रोग होऊ शकतात.
  बीच हे औषध दिल्यानंतर कडक शिस्तीबद्दलचा त्यांचा आग्रह कमी होतो.आजूबाजूच्या लोकांचे जीवन सुसह्य  होते.त्यांचा स्वतःचा मनस्तापही कमी होतो.
  पहा तर मग तुमच्या आजूबाजूला असे जमदग्नी चे अवतार कोण आहेत?
मनस्थिती  बदला  ::  निरोगी व्हा
***  *****  *****  ***

2.आस्पेन (Aspen)

या औषधाच्या लोकांना  भीती वाटत असते.पण ही भीती नेमकी कशाची वाटते हे सांगता येत नाही.अनाकलनीय ,गुढ गोष्टींची भीती वाटत असते.त्याचे स्पष्टीकरण त्यांना देता येत नाही.कधीकधी ही भीती इतकी असते की त्यांना अचानक दरदरून घाम फुटतो.झोपेतून अचानक जागा होऊन ओरडून ऊठतो.लहान मुलांना,
टीन एज मधील मुला मुलींना किंवा रजोनिवृत्तीच्या वेळी काही स्त्रीयांना अशी भीती जाणवू शकते.
          दोन महिन्यापुर्वी एक त्रासलेले आईबाबा त्यांच्या 6 महिन्याच्या मुलाला घेऊन  माझ्याकडे आले.त्यांची अशी तक्रार  होती की त्यांचा हा मुलगा 3 महिन्यांपासून अचानक रडतच झोपेतून
उठतो.काही केल्या थांबत नाही.रडून रडून पहाटे कधीतरी झोप लागते.त्यांना संध्याकाळी  च परदेशात जायचे असल्याने लगेचच काही औषध देणे भाग होते.माझा हात आस्पेन कडे गेला.
त्यांना 2 गोड गोळ्या  चमचाभर पाण्यात विरघळवून 4 वेळा द्यायला सांगितले .महिन्या नंतर त्यांचा फोन आला...मुलाची ही तक्रार पूर्ण गेली.आता दूधही नीट प्यायला लागला.
त्यावेळी  पुष्पौषधी सारखी औषधे आपल्याकडे  आहेत याचे समाधान वाटले.कारण इतक्या लहान मुलाला या समस्येसाठी दुसरे काहीच देता येण्यासारखे नव्हते.
मनस्थिती  बदला : निरोगी व्हा

1::अॅग्रीमनी(Agrimony )::

आपल्या अवती भोवती हसणारे,खूप गप्पा मारणारे ,विनोदबुद्धी असणारे असे अनेक लोक आढळतात.पण वरवर आनंदी आहोत असे भासवणारे   काही लोक  मात्र आतून  पुर्ण विदीर्ण  मनस्थितीत असतात.आनंदी पणाच्या मुखवट्याआड आपले दुःख लपवत असतात.आपल्या चिंता ,वेदना ,काळजी सहन करत असतात.मनातील विचारांच्या गर्दीमुळे  यांना शांत झोपही येत नाही.अशा व्यक्तींना एकटे रहायला आवडत नाही.चारचौघात राहणे आवडते.
काही लहान मुलेही वयाला न शोभणारा समजूतदार पणा दाखवतात. त्यांचा  बालपणातील अवखळपणा  ,निरागसता हरवलेली असते.
अशांसाठी अॅग्रीमनी  हे औषध उपयुक्त  आहे.