Sunday, 26 June 2016

मनस्थिती बदला :: निरोगी व्हा

          11.एल्म (ELM)

हे औषध  अशा कर्तबगार लोकांसाठी आहे ज्यांचा आत्मविश्वास काही काळापुरता कमी होतो. ह्या व्यक्ती खूप हुशार ,बुद्धिमान,कर्तबगार असतात.घरात ,समाजात मानाचे स्थान भुषवत असतात.उदा. डाक्टर्स, मुख्याध्यापक,उद्योगपती,मंत्री,मोठ्या कुटुंबातील  कुटुंबप्रमुख .त्यांच्या निर्णयावर इतरांचे जिवीत अवलंबून असते.जबाबदारीच्या ओझ्यामुळे  त्यांना काही काळापुरते निराशा येते,असमर्थ वाटते,निर्णय घेता येत नाही.हे तात्कालिक  असते.पण या काळात  एखादा चुकीचा निर्णय घेतला गेला तर त्याचे परिणाम  सर्वानाच भोगावे लागतात.
        वाढत्या स्पर्धेमुळे ही  हुशार मुलांना आलेले नैराश्य या सर्वासाठी हे औषध खूप उपयोगी आहे.
माझ्याकडे 3 महिन्यापुर्वी एक 85 ते 90 टक्के मिळवणार्या मुलाची  आई त्याला घेऊन आली होती...अगदी हतबल होऊन ती सांगत होती.  'पहा ना डाॅक्टर 10 वी ची परीक्षा  15 दिवसावर आली आहे आणि हा परीक्षा द्यायचे नाही म्हणतोय..आम्हाला तर काय करावे काहीच कळत नाही..'मी त्याला समजावले..आणि एल्म हे औषध दिले.त्याने  10 वी चे पेपर्स  चांगले दिले..95 टक्के ची अपेक्षा  आहे त्याला.

Thursday, 23 June 2016

मनस्थिती बदला  ::  निरोगी व्हा

             🌸 10. क्रॅब अॅपल

कधी कधी आपल्या स्वभावातील एखादा दोष आपल्याला अजिबात आवडत नाही.आपली आपल्यालाच किळस वाटत राहते.कधी आपण आपल्या स्वभावा विरूद्ध एखादे वाईट भाष्य किंवा कृती करून जातो ,त्यामुळे  मनात नसतानाही दुसरा माणूस दुःखी होतो आणि मग आपण असे का बोललो हा विचार मनात काट्यासारखा सलत राहतो.मन अशांत होते .अशा वेळी  क्रॅब अॅपल ची गरज असते
          कधी कधी इसब ,नायटा ,एखादा  त्वचारोग स्वतःला अथवा इतरांना  झाल्यास त्याची किळस वाटू लागते.
एखादी गृहीणी स्वच्छतेच्या विचारांनी इतकी पछाडलेली असते की धूळ ,कचरा,घाण ,अस्वच्छता  ,दुर्गंधी पाहीली की यांचे मनस्वास्थ्य नष्ट होते.
अशांसाठी हे पुष्पौषध उपयोगी आहे.

Wednesday, 22 June 2016

मनस्थिती  बदला :: निरोगी व्हा

          🌸 9. क्लेमॅटिस (CLEMATIS)

ही लोक जणू वेगळ्याच  जगात वावरत असतात.कुठेतरी शून्यात हरवलेली नजर,उदासीनपणा,स्वप्निलपणा,झोपाळूपणा इ.लक्षण वैशिष्ट्ये  यांच्यात आढळतात.आजूबाजूला काय चालले आहे याची ते दखलच घेत नाहीत.त्यांना झोपही खूप लागते.कोणत्याही कामात त्यांचे चित्त एकाग्र  होत नाही कारण वर्तमान काळातील घडामोडी,जीवनातील लहानमोठ्या घटना यांचे औचित्य च नष्ट झालेले असते.आपल्या अडचणी ,जीवनातील दुःखदायक गोष्टी मनाच्या पडद्याआड करतात.जेव्हा एखाद्या दुःखदायक परिस्थिती ला तोंड द्यायची वेळ  येते तेव्हा संकटांचा मुकाबला करण्याऐवजी खोट्या आभासी जगात वावरतात.
       हे मूल वेंधळे  ,आपल्याच विचारात हरवलेले असते.मग कुठेतरी ठेचकाळते,कोलमडते.स्वतःच्या तंद्रीत  असल्याने  वर्गात शिकवलेले कळत नाही.

Monday, 13 June 2016

मनस्थिती बदला :: निरोगी व्हा

        🌸 8. चिकोरी  (CHOCORI)

या  औषधाचे लोक स्वार्थी  व स्वतःला महत्व देणारे असतात.ही कुठेही गेलीत तरी स्वतःपुरते पाहातील.आत्मकेंद्री व अहंकारी असतात.छोट्या छोट्या कारणाने त्यांच्यातला अहं दुखावला जातो.आपल्या जवळच्या व्यक्तींवर त्या अधिकार गाजवतात.प्रेमाच्या व्यक्ती  सतत आपल्याच जवळ रहाव्यात असा त्यांचा आग्रह  असतो.यांच्याकडे कुणी लक्ष  दिले नाही की रूद्रावतार धारण करतात.स्वतःकडे इतरांचे लक्ष  वेधून घेण्यासाठी  काहीच मिळाले नाही तर या व्यक्ती  आजाराचे माध्यम  शोधतात .व सहानुभूति  मिळवतात.
         ही वृत्ती अगदी तान्हया बाळात सुद्धा  असते. बाळाला  सतत आई समोर लागते.चालायला लागले की आईचा पदर धरून राहणार .थोडीही मोकळीक मिळू देत नाही.हे मूल आपले खेळणे दुसर्याला देत नाही.

Friday, 3 June 2016

मनस्थिती बदला ::निरोगी व्हा

           🌸7. चेस्टनट बड

        काही माणसे आयुष्यात त्याच त्याच चुका करताना आढळतात .मागील अनुभवावरून, केलेल्या चुकांवरून धडा घेऊन  कृती करणे त्यांना जमत नाही.कधी उदासीनतेमुळे,कधी दुर्लक्ष  केल्यामुळे, घाईगडबडीत कृती केल्यामुळे  किंवा कधीकधी आपल्या कृतींचा मागोवा न घेतल्यामुळे ,पुरेशी निरीक्षणशक्ती नसल्यामुळे  त्याच त्याच चुका परत परत केल्या जातात.
यांना एकाच प्रकारचे आजार वारंवार होतात.
     अभ्यासात मागे राहणारी मुले,त्याच प्रकारच्या चुका करून अपयशी होणारे विद्यार्थी.
       नविन गोष्टी  लवकर आत्मसात करता न येणे.पुर्वीपेक्षा स्मरणशक्ति  कमी झालीय त्यामुळे चटकन शिकता येत नाही अशी तक्रार  करणारे प्रौढ .
 या सर्वासाठी चेस्टनटबड हे उत्तम औषध आहे.