Thursday, 21 December 2017

मनस्थिती बदला    ::   निरोगी व्हा

                   🌸 राॅक वाॅटर

     या औषधाचे वेगळेपण म्हणजे  फुलाऐवजी पाण्यापासून बनवले जाते.वेल्समधील निर्झराच्या ,खडकावरून वाहणार्या नैसर्गिक पाण्यापासून बनवले जाते.
जसे खडक अभेद्य,कठीण असतो पण पाण्याची संततधार त्यावर पडली की तो नरम होतो तसेच पाषाणह्रदयी ,कठोर मनोवृत्तीच्या लोकांना हे औषध देत राहीले की त्यांच्यातही नरमाई येते.
       आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक लोक पाहातो की, स्वतःची मूल्ये ,टोकाचा आदर्शवाद ,सिद्धांत वाद यामुळे या लोकांचा स्वभाव खूप कठोर झालेला असतो. स्वतःच्या तत्वाला ते अजिबातच मुरड घालायला तयार नसतात.सतत स्वतःच्या मनाला मारून शिस्तप्रीयतेत जगतात.पण त्यांच्या अशा एकांगी वागण्याने ते जीवनाचा खरा आनंद घेऊ शकत नाही  आजूबाजूच्या लोकांनाही घेऊ देत नाही .यांना asthama, muscle stiffness, poriasis यासारखे आजार होऊ शकतात.
 राॅक वाॅटर दिल्याने यांच्या पाषाणह्यदयात   परिवर्तन होऊन , स्वभावात नरमाई येते.अतिटोकाचे आदर्शवादी जीवन टाळून   पाण्याप्रमाणे प्रवाही आणि सहज जीवन होते.
मनस्थिती बदला  :: निरोगी व्हा
           
             🌸   राॅक रोज

मनाचा थरकाप होणारी भीती, अचानक झालेल्या आघातामुळे वाटणारी भीती, एखादा अपघात प्रत्यक्ष बघणे, जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी ऐकणे यामुळे पोटात भीतीचा गोळा उठतो , हृदय बंद पडणार आहे असे वाटते . तसेच अचानक उद्भवणाऱ्या जीवघेणा आजार या सर्वांमुळे रक्त गोठवून टाकणारी भीती वाटते .मन सतत भीतीच्या सावटाखाली वावरल्या सारखे वाटते. या प्रकारच्या भीतीतून सावरण्यासाठी रॉकरोज चांगलं काम करतं. तसेच रात्री झोपेत किंचाळणार्या  मुलांना ही हे औषध घेता येते.
           मिम्युलस  हे पुष्पौषधी ही भीती साठी आहे. पण रॉक  रोजची भीती त्याच्या कितीतरी अधिक पटीने असते गंभीर स्वरूपाची असते.