Thursday, 21 December 2017

मनस्थिती बदला  :: निरोगी व्हा
           
             🌸   राॅक रोज

मनाचा थरकाप होणारी भीती, अचानक झालेल्या आघातामुळे वाटणारी भीती, एखादा अपघात प्रत्यक्ष बघणे, जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी ऐकणे यामुळे पोटात भीतीचा गोळा उठतो , हृदय बंद पडणार आहे असे वाटते . तसेच अचानक उद्भवणाऱ्या जीवघेणा आजार या सर्वांमुळे रक्त गोठवून टाकणारी भीती वाटते .मन सतत भीतीच्या सावटाखाली वावरल्या सारखे वाटते. या प्रकारच्या भीतीतून सावरण्यासाठी रॉकरोज चांगलं काम करतं. तसेच रात्री झोपेत किंचाळणार्या  मुलांना ही हे औषध घेता येते.
           मिम्युलस  हे पुष्पौषधी ही भीती साठी आहे. पण रॉक  रोजची भीती त्याच्या कितीतरी अधिक पटीने असते गंभीर स्वरूपाची असते.

No comments:

Post a Comment