Tuesday, 18 July 2017

मनस्थिती बदला :: निरोगी व्हा

                🌸  25 .रेड चेस्टनट
   
           काही जणांचा स्वभाव खूप काळजी करण्याचा असतो.ते सतत कुणाची ना कुणाची काळजी करत असतात.अगदी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करत बसतात.कुणी जवळचे नातेवाईक  हाॅस्पिटल ला अॅडमिट असेल,घरचे कुणी आजारी असेल तर काळजीने  यांनाच आजारपण येते.  अशा प्रसंगी काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे आवश्यक असते. 'रेडचेस्टनट 'हे पुष्पौषध अशा व्यक्तींना दिल्यावर त्या काळजीला सकारात्मक स्वरूप येऊन कठीण प्रसंगी हतबल न होता सर्वांना धीर देतील आणि खर्या अर्थाने  समोरच्याची काळजी घेतील.
           माझ्या एक पेशंट आहेत.त्यांचा इतका काळजी करण्याचा स्वभाव आहे की,त्यांची मुलगी काॅलेजसाठी घरातून निघून पुन्हा घरी येईपर्यंत  त्या काळजी करत राहतात.सतत त्यांच्या फोन ने मुलगी ही वैतागली होती.अर्थात त्यामागे काही वर्षापुर्वी झालेला मुलाचा अपघाती मृत्यू हे ही कारण आहे .त्यांना रेडचेस्ट बरोबर हनीसकल (भुतकाळातील आघातासाठी)गाॅर्स (निराशेसाठी)हे तीन महिने दिले.आता त्या निश्चिंत होऊन मुलीला काॅलेजला जाऊ देतात.
मनस्थिती बदला :: निरोगी व्हा

        🌸26.पाईन (pine)

    काही व्यक्ती  नेहमी स्वतःला दोषी  ठरवत असतात।घरात ,ऑफीसात काहीही वाईट घडले,चुकीचे घडले तरी यांना  वाटत असते की माझ्या चुकीमुळे  घडले.सतत अपराधीपणाच्या ओझ्याखाली वावरत असतात.स्वतःला नको इतका दोष देत असतात.या व्यक्तींच्या स्वतःच्या कर्तव्या बद्दलच्या अपेक्षा  जास्तच असतात.ही लोक पापभिरू,प्रामाणिक असतात.सहसा अधार्मिक  कृत्य ,चोरी,भ्रष्टाचार  अशी कृत्य घडत नाहीत.पापपुण्याच्या अवास्तव कल्पना असतात.त्यांची ईश्वरभक्तीही अपराधीपणातून आलेली असते.
         या अपराधी पणामुळे जगण्यातला निखळ  आनंद  हिरावून बसतात.मुक्तपणे जगता येत नाही.अशा व्यक्तींसाठी पाईन हे अतिशय उपयुक्त औषध आहे.

       (डाॅ. योगिता दुसाने..पुणे)
मनस्थिती बदला::निरोगी व्हा

        🌸 23.ऑलिव्ह (Olive)

      बराच काळ  सातत्यानं काम केल्यावर शरीर आणि मन दोन्हीही थकते.प्रतिकूल परिस्थीती,दीर्घकालीन  आजाराशी मुकाबला करत असताना शरीराची आणि मनाची शक्ती क्षीण होते.काही करावेसे वाटत नाही.अशा वेळी ऑलिव्ह हे औषध नवसंजीवनी  देणारे ठरते.
      काही व्यक्तींवर जबाबदार्या इतक्या असतात की, त्या ओझ्याखाली  ते दबून जातात.विश्रांती आणि मनोरंजनासाठी वेळच नसतो,शरीराची आणि मनाची झालेली झीज भरून निघण्याआधीच नविन जबाबदारी येते.काही दिवसानंतर हे ओझे असह्य होते .हाती घेतलेले काम अर्धवट  सोडावे लागते.
        तसेच जिथे जिथे शारिरीक  ताकद जास्त वापरायला हवी अशा सर्व  ठिकाणी कामाला सुरूवात करण्यापुर्वी 'ऑलिव्ह 'हे औषध वापरावे.उदा.शर्यतीत धावणार्यांसाठी,गिर्यारोहकांसाठी,वेटलिफ्टर साठी,खुप वेळ  डोळ्याचे काम करणार्यांसाठी .एकाच प्रकारची तीच  ती कामे करून शरीर व मन थकते.यांना जरूर वापरून पहा.कार्यक्षमतेत नक्की वाढ झालेली दिसेल
       मुलांमध्ये पेपर लिहीताना किंवा वहीत आधी सुंदर अक्षर असते नंतर गिचमीड होत असेल,थोड्याशा अभ्यासाने मुले थकत असतील, खेळल्यावर हात पाय दुखत असतील तर ऑलिव्ह जरूर वापरून पहा.
मनस्थिती  बदला::निरोगी व्हा

             🌸  ओक (OAK)

         'अशक्य'हा शब्दच ज्यांच्या शब्दकोशात नसतो,अशा व्यक्तींना कधीकधी क्षणिक हताशपणा येतो त्यासाठी हे खूप छान औषध आहे.
        'ओक' टाईपच्या व्यक्तीजीवनातील अडीअडचणींचा सातत्याने मुकाबला करतात.'प्रयत्न ','आणखी प्रयत्न'हे जणू त्यांचे ब्रीदवाक्यच असते.दुर्दम्य आशावादानं झपाटलेले असतात.अनेकांना आधार देतात.
        पण माणसाच्या प्रयत्नांना ही काही मर्यादा  असतात. शरीर आणि मन यांना किती ओझे लादायचे याला काही सीमा असते.हेच या व्यक्तीना कळत नाही.अनेकदा  तब्येतीकडे दुर्लक्ष  करून ते कामे करत असतात.स्वतःच्या मर्यादा न ओळखून ते प्रयत्न करत राहतात.त्या कार्यात अडचणी आल्यास अशा आशावादी  माणसांचे मन काहीवेळा  ढासळते.आणि सरतेशेवटी कोसळून जाते.
        अशा वेळी  'ओक' हे औषध द्यावे.
मनस्थाती बदला::निरोगी व्हा

                  🌸21.मस्टर्ड (Mustard)

      कोठून येते मला कळेना उदासीनता ही ह्रदयाला
काय बोचते ते समजेना ह्रदयाच्या अंतःह्रदयाला।
      असं काहीतरी अचानक वाटू लागणं हे मस्टर्ड  चे लक्षण आहे. काहीच करू नये असे वाटते.कुठेच मन लागत नाही.मनावर कसले तरी दडपण जाणवते..
जीवन झाकोळून  टाकणारा,मनाला व्यापून टाकणारा निराशामय उदासपणा.या उदासपणाचे कारण स्वतःलाही सांगता येत नाही चाळीस ..पंचेचाळीस  वयाच्या अनेक स्रीया आपल्याला दिसतात की त्यांना कुठेच काही कमी नसते,तरीही मनाला निराशा आलेली असते.त्यामुळे सर्व असूनही त्या त्याचा सुखोपभोग घेऊ शकत नाही.हे निराशेचे ढग मस्टर्ड  या औषधाने दूर केले की त्या पुर्वीसारखेच आनंदित होऊ शकतात.
              मस्टर्ड  ची निराशा ही कारण नसताना आलेली असते.आधी आपण पाहिलेले जेंटीयन आणि गाॅर्स हे औषधही निराशेचेच आहेत पण ती निराशा कारणासहीत असते.
         पौगंडावस्थेत जाताना काही मुलांना,मेनोपाॅझ च्या वेळी काही स्रीयांना ही निराशा येऊ शकते.
 या अकारण येणार्या  निराशेसाठी मस्टर्ड  हे औषध जरूर देऊन पहावे.
मनस्थिती  बदला::निरोगी व्हा

              🌸20.मिम्युलस(MIMULUS)
     
      'भीती'हे आपले अगदी आदिमानव  असताना पासूनचे instinct आहे.ही भीती काही प्रमाणात योग्यही असते पण काही वेळा  हे भीतीचे प्रमाण इतके वाढते की ते व्यक्तीमत्वच पोखरून टाकते.या भीतीमुळे  आपले पहिले मूलाधार चक्र ब्लॉक  होते.त्यामुळे आयुष्य जगण्यासाठी  छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो.
        भीती ही कोणत्याही गोष्टीची वाटू शकते..कुणाला आजाराची,कुणाला एकटे राहण्याची,पाण्याची,उंचावर जाण्याची,चारचौघात बोलण्याची,स्टेजवर बोलण्याची,विमान प्रवासाची,अपघाताची,चोरीची..काही स्त्रीयांना तर पालीची आणि झुरळाची ही भीती वाटते.या सर्वानी मिम्युलस घ्यावे.
        लहान मुलांना  स्टेजवर बोलण्याची ,परीक्षेची,
 शिक्षकांची,शाळेची भीती वाटते.काही मुलांमध्ये या भीतीमुळे  बेडवेटींग ,तोतरे बोलणे,पोटदुखी,नखे कुरतडणे यासारख्या समस्या निर्माण  होतात.वेळीच उपाय योजना केली नाही तर त्यांचे व्यक्तीमत्व लाजाळू,मागे रहाणारे,उदास बनते
भीती घालवण्यासाठी मिम्युलस आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी लार्च हे काॅम्बिनेशन छान काम करते.आस्पेन हे ही  भीतीवर काम करते.पण आस्पेनची भीती ही कारणाशिवाय असते.ती हूरहूर लावणारी भीती असते.तर मिम्युलस ची भीती सकारण असते.
.
              मनस्थिती बदला::निरोगी व्हा
                   🌸🌸 लार्च (LARCH)🌸🌸


               अनेक जण अंगी चांगले गुण असूनही आत्मविश्वासाच्या अभावी प्रगती करू शकत नाही.काहीजण अपयशाच्या भीतीने कामच सुरू करत नाही तर कधी नोकरी व्यवसायात  ,अभ्यासात खंड पडला तर आत्मविश्वास जातो.
        आत्मविश्वास  गमावण्याचे कोणतेही कारण असले तरी मग ती व्यक्ती प्रभावशून्य , दुःखी,मागे मागे राहणारी असते .इंटरव्ह्यू देणे,एखाद्या कलेचे सादरीकरण करणे,गाडी चालवणे इतकेच काय पण काहींना कुठे एकटे जाणेही जमत नाही.
           काही लहान मुले वर्गात हुशार असूनही मागे मागे राहतात,बुजरी असतात,काहीजण तोतरे बोलतात,स्टेजवर जाण्याचा प्रसंग आला तर भीतीने गाळण उडते,परीक्षेला गेल्यावर आत्मविश्वासाच्या अभावाने गोंधळ  उडतो.
           अशा सर्वानी 'लार्च' हे पुष्पौषध घेऊन  पहा.मी तर माझ्या प्रॅक्टिस  मध्ये खूप जणांना हे औषध वापरते.माझे सर्वात आवडते औषध आहे हे.