मनस्थाती बदला::निरोगी व्हा
🌸21.मस्टर्ड (Mustard)
कोठून येते मला कळेना उदासीनता ही ह्रदयाला
काय बोचते ते समजेना ह्रदयाच्या अंतःह्रदयाला।
असं काहीतरी अचानक वाटू लागणं हे मस्टर्ड चे लक्षण आहे. काहीच करू नये असे वाटते.कुठेच मन लागत नाही.मनावर कसले तरी दडपण जाणवते..
जीवन झाकोळून टाकणारा,मनाला व्यापून टाकणारा निराशामय उदासपणा.या उदासपणाचे कारण स्वतःलाही सांगता येत नाही चाळीस ..पंचेचाळीस वयाच्या अनेक स्रीया आपल्याला दिसतात की त्यांना कुठेच काही कमी नसते,तरीही मनाला निराशा आलेली असते.त्यामुळे सर्व असूनही त्या त्याचा सुखोपभोग घेऊ शकत नाही.हे निराशेचे ढग मस्टर्ड या औषधाने दूर केले की त्या पुर्वीसारखेच आनंदित होऊ शकतात.
मस्टर्ड ची निराशा ही कारण नसताना आलेली असते.आधी आपण पाहिलेले जेंटीयन आणि गाॅर्स हे औषधही निराशेचेच आहेत पण ती निराशा कारणासहीत असते.
पौगंडावस्थेत जाताना काही मुलांना,मेनोपाॅझ च्या वेळी काही स्रीयांना ही निराशा येऊ शकते.
या अकारण येणार्या निराशेसाठी मस्टर्ड हे औषध जरूर देऊन पहावे.

No comments:
Post a Comment