मनस्थिती बदला :: निरोगी व्हा
*** ***** ***** ***
2.आस्पेन (Aspen)
या औषधाच्या लोकांना भीती वाटत असते.पण ही भीती नेमकी कशाची वाटते हे सांगता येत नाही.अनाकलनीय ,गुढ गोष्टींची भीती वाटत असते.त्याचे स्पष्टीकरण त्यांना देता येत नाही.कधीकधी ही भीती इतकी असते की त्यांना अचानक दरदरून घाम फुटतो.झोपेतून अचानक जागा होऊन ओरडून ऊठतो.लहान मुलांना,
टीन एज मधील मुला मुलींना किंवा रजोनिवृत्तीच्या वेळी काही स्त्रीयांना अशी भीती जाणवू शकते.
दोन महिन्यापुर्वी एक त्रासलेले आईबाबा त्यांच्या 6 महिन्याच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले.त्यांची अशी तक्रार होती की त्यांचा हा मुलगा 3 महिन्यांपासून अचानक रडतच झोपेतून
उठतो.काही केल्या थांबत नाही.रडून रडून पहाटे कधीतरी झोप लागते.त्यांना संध्याकाळी च परदेशात जायचे असल्याने लगेचच काही औषध देणे भाग होते.माझा हात आस्पेन कडे गेला.
त्यांना 2 गोड गोळ्या चमचाभर पाण्यात विरघळवून 4 वेळा द्यायला सांगितले .महिन्या नंतर त्यांचा फोन आला...मुलाची ही तक्रार पूर्ण गेली.आता दूधही नीट प्यायला लागला.
त्यावेळी पुष्पौषधी सारखी औषधे आपल्याकडे आहेत याचे समाधान वाटले.कारण इतक्या लहान मुलाला या समस्येसाठी दुसरे काहीच देता येण्यासारखे नव्हते.

No comments:
Post a Comment