Sunday, 3 July 2016

मनस्थिती  बदला :: निरोगी व्हा::

🌸 12.जेटिंयन (GENTIAN)

             प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात.सकारात्मक आणि नकारात्मक .जेंटीयन प्रकारचे लोक नकात्मक बाजू आधी बघतात.गुलाबाच्या झाडाजवळ  गेल्यावर त्यांना फुललेला गुलाब दिसण्याआधी त्याचे काटेच दिसतात.तसेच छोट्या छोट्या कारणावरून उदास होतात..निराश होतात..उदा. गाडी उशिरा येणे,हवी ती वस्तु  लवकर न सापडणे,हवं ते दुकान बंद असणे,मोलकरीण आली नाही..अशा किरकोळ  कारणांवरून येता जाता ही लोक निराश होतात.जीवनातला आनंद घालवून बसतात.
          चाचणी परीक्षेत थोडे कमी मार्क पडले ,शिक्षक रागावले की आता शाळेतच जाणार नाही,असं म्हणणारे विद्यार्थी, खेळताना छोट्या कारणावरून माघार घेऊन घरी येणारी मुले..थोडंसंही मनाविरुद्ध  झालेले यांना खपत नाही.सोपवलेले काम जमत नाही असे लक्षात आल्यावर लगेच ते काम सोडून देतात.
       परिस्थीतीला टाळून दूर पळून जाण्याची वृत्ती नाहीशी करण्यासाठी जेंटीयन चा चांगला उपयोग होतो.

No comments:

Post a Comment